Nilesh Kunjir
नमस्कार,
माझ्याबदद्ल काय लिहु...? माझ्याबदद्ल काही लिहिण्यापेक्षा ज्यांनी मला घडवले त्यांच्याबदद्ल लिहायला मला आवडेल.
चित्रपटनिर्मिती, कला, छायाचित्रण, कविता आणि साहित्य या निरनिराळ्या क्षेत्रात ठसा उमटवण्याचा माझा तसेच आमच्यातल्या प्रत्येकाचा प्रयत्न आहे आणि तो ही तुमच्या साथीनेच.
चित्रकविता' या संकेतस्थळाचा जन्म सुद्धा असेच काहीतरी वेगळे करण्याच्या कल्पनेतून झाला. यात विविध क्षेत्रात काम करणारे माझे मित्र, कलाप्रेमी, मराठी कवितांवर प्रेम करणारे या सर्वांचाच सहभाग आहे. एकीचे बळ म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर 'चित्रकविता' हे माझ्या दृष्टीने सर्वात उत्तम उदाहरण आहे.
चित्रकविता' हे आपले संकेतस्थळ सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठते आहे ही लोकप्रियता अशीच वाढत जाईल यात शंका नाही. आपला प्रतिसाद आणि अभिप्राय भरभरून लाभतोय आणि या पुढेही तो तसाच लाभेल ही सदिच्छा. आपणा सर्वांच या चित्रकवितेच्या दालनात मन:पूर्वक स्वागत...!
Contact Information
kunjir.nilesh@gmail.com
Nilesh Kunjir